Share

शाहू महाराजांनी आरक्षण दिले, मग आता मराठा समाजाला आरक्षणामधून बाहेर का फेकले जात आहे?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.

‘शाहू महाराज यांनी समाजाला आरक्षण दिले. मराठा समाज हा सर्व समाजाला सोबत घेऊन राहिला आहे. मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले आहे. मग आता मराठा समाजाला आरक्षणमधून बाहेर का फेकले जात आहे, असा सवाल खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला.नवी मुंबईत मराठा आरक्षण बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्वच प्रकारच्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावर्षी मागणी मराठा समाजातील नेते करत आहेत.  एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे. एमपीएससीची सर्व परीक्षा केंद्र ११ ऑक्टोबरला बंद करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.  त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षांबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी देखील सरकारकडे मागणी केली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!