Share

मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अशातच मराठा आरक्षणप्रश्नी प्रश्न विचारला असता ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तरुणाला शिवीगाळ केल्याचा क्लिप प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

खुद्द या युवकाने एक व्हिडीओ बनवून सदर घटना सर्वांसमोर आणली असून आपले काही बरे वाईट झाल्यास त्याला सत्तारच जबाबदार असतील असं देखील सांगितलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरग गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी भगवान जीवरग या तरुणाने मराठा आरक्षणाच काय झालं? व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तारांना प्रश्न केला असता त्यांची जीभ घसरली व त्यांनी त्याला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

‘तुझ्या घरात घुसून मारेन, तुझं खानदान बरबाद करेन’ अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणाने केल्याने सद्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंत्रिपद असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची धमकी देणे व शिवीगाळ करणे हे दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर या युवकाने पोलिसांनी योग्य कारवाई करावी अन्यथा जे काही होईल त्याला मंत्री सत्तारचं जबाबदार असतील असे देखील सूचित केलं आहे.

दरम्यान, आता या सर्व संतापजनक प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राज्यात एक प्रकारची अराजकता माजली आहे, हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपवरून दिसते. मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारल्याने सत्तारांनी युवकाला आई-बहिनीवरून शिव्या देत दमदाटी केली आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारे नाही. त्यामुळे या क्लिपचे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व अटक करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे .

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!