Share

‘सेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार’

Published On: 

नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना निवडून आणण्याचे लक्ष्य असलेल्या सेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकतीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. यात सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफन, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला , गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे.

दरम्यान, सेनेची हि स्टार प्रचारकांची यादी जाहीर होताच भाजप नेते निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. ह्या स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!