नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना निवडून आणण्याचे लक्ष्य असलेल्या सेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकतीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.
शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. यात सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफन, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला , गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या पणन खात्याच्या स्थगिती आदेशाची होळी
- राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 परीक्षा केंद्राच्या शंभर मिटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- उद्धवा धुंद झाला तुझा दरबार ! मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण
- जाणून घ्या मोदींनी गेल्या सहा वर्षात खरच पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

