Share

‘वाझेला उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री आता राजीनामा का देत नाहीत ?’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

यानंतर, नैतिकता लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने विविध प्रकरणांवरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी गेले काही महिने अक्षरशः रान उठवले होते. आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विविध नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत.

भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच का राजीनामा देत नाहीत ? असा सवाल केला आहे. ‘परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने १५ दिवसांत चौकशी करून अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्ल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?’ असा सवाल नारायण राणे यांनी करत एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!