मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकरणावर आता का भाष्य करत नाहीत ? असा सवाल केला आहे. ‘नैतिकतेचे भान राखून उशिरा का होईना देशमुखांनी राजीनामा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, वाझे हा लादेन नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता समोर येऊन बोललं पाहिजे. वाझेच समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ते या प्रकरणी आता काहीच का बोलत नाहीत ?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षा कशा घेणार ?, शिक्षणमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
- मोठी बातमी : अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा
- अनिल देशमुखांना ओपन चॅलेंज करणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत ?
- भालचंद्र शिरसाट यांना दिलासा देत मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने दिला जोरदार दणका
- न्यायालयाच्या निकालानंतर विरोधक आक्रमक,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा धरला जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

