Share

मुस्लिम महिला, मुली हिजाब का बांधतात; जाणून घ्या

Published On: 

सध्या कर्नाटक राज्यात हिजाब बंदी प्रकरण जोरदार तापले असून, संपूर्ण देशाचे आणि विदेशाचे तिकडे लक्ष लागून आहे. गेले काही दिवस कर्नाटकातील काही शाळांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना शाळेने प्रवेश नाकारला होता. त्याविरोधात प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेले आहे. सध्या न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर निकाल येणे अपेक्षित आहे. कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांचा वाद चिघळला असून काही ठिकाणी संचार बंदी (कलम १४४) लागू केले आहे.

इस्लाम धर्म जेवढा जुना आहे तेवढाच विविधतापूर्ण देखील आहे. इस्लाम मध्ये, दररोजची करावयाची कामे, आचरण, वागणूक, प्रार्थना इत्यादींपासून पुरुष, स्त्रिया आणि बालकांचा पेहराव यावर सुद्धा सुचना आणि आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मानुसार प्रत्येक स्त्री ने घराबाहेर पडताना संपूर्ण अंग झाकले जाईल याची काळजी घ्यावी, तिने डोक्यावर नेहमी ओढणी किंवा पदर घ्यावा, डोक्यावर ओढणी पदर नसणे म्हणजे इस्लाम नुसार ती स्त्री आचरण करत नाही असा त्याचा अर्थ होतो. तसेच घराबाहेर पडताना मुस्लिम स्त्रीने पर पुरुषापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून देखील बुरखा आणि हिजाब परिधान करतात. बुरखा आणि हिजाब परिधान केल्याने स्त्रीला आपला पोशाख परिपूर्ण झाला असून ती आता घराबाहेर पडू शकते असे वाटते. म्हणून मुस्लिम स्त्रिया बुरखा आणि हिजाब परिधान करतात.

यावर आता देश विदेशातून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान हा वाद काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता. त्यात  सुरुवातीला फक्त शाळा आणि महाविद्यालय प्रशासन होते मात्र आता त्यात हिंदू संघटनांनी देखील उडी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सर्वांना धर्माचे आणि धार्मिक आचरणाचे स्वतंत्र दिले आहे. परंतु शाळेत आणि महाविद्यालयात एकसंघ गणवेश असला पाहीजे, जाती आणि धर्माचा तेथे अंकुश नको असे सर्वांचे मत आहे. त्याचमुळे सर्व स्तरातून या हिजाब बंदी प्रकरणाला प्रतिक्रिया मिळत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने कुराण च्या प्रती मागवून अभ्यास पूर्ण निर्णय देण्याची तयारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!