मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर तातडीने सुनावणी करण्यात आली.
यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अर्णव गोस्वामीच्या सुटके नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. यातच सदर प्रकरणावर स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने देखील खोचक ट्विट केले होते. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचं म्हणत विधि शाखेच्या एका विद्यार्थ्यानं आणि दोन वकिलांनी ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालणार आहे.
A joint committee of Parliament for Data Protection asks Twitter why it has not taken action against the tweets by comedian Kunal Kamra (in file pic) about the Chief Justice of India pic.twitter.com/2JOdKAOAzr
— ANI (@ANI) November 19, 2020
दरम्यान, आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाविरोधात आक्षेपार्ह ट्विट करुन त्यांची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात ट्विटरने कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता माहिती संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संसदीय संयुक्त समितीने ट्विटरला विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचं सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही – जयंत पाटील
- ‘वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही’
- कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’


