Share

‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’

Published On: 

मुंबई : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, परिवहन खात्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पॅकेज दिलं तर मग वीजबिलात सरकार का दिलासा देऊ शकत नाही? यासाठी भाजप, मनसेसह इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ऊर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे तर परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

या विषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी पुन्हा एकदा काँग्रेसची खदखद व्यक्त केली. काँग्रेसच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केली आहे, असं थोरात म्हणाले. तर, सरकार आर्थिक अडचणीत आहे. दर महिन्याला 12 हजार कोटींचं कर्ज काढावं लागतंय, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपने कॉंग्रेसला चिमटा काढला आहे. बाळासाहेब थोरात अर्धवट बोलत आहेत. काँग्रेसच्या खात्यांना निधी नाही तर इज्जत सुद्धा दिली जात नाही अशी टीका आ. आशिष शेलार यांनी केली आहे. वीजबिल माफीचा विषय भाजपचा आहे. मनसे आमच्यासोबत आली ही चांगली बाब आहे असंही ते म्हणाले. आम्ही सरकारला चेतावणी देतोय, आमची अपेक्षा आहे वीजबिल कमी करा. आम्ही हा विषय तडीस नेल्याशिवाय सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.न्यूज १८ लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!