🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे ठाकरे-मोदी संबंध सुधारत असून त्याचा पर्यायाने भाजपलाच फायदा होणार असल्याचं चित्रं होतं. मात्र, राऊत यांच्या या विधानाने संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. ‘पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या या खळबळजनक विधानामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे. यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिउत्तर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर आता पलटवार केला आहे. भाजपने गुलामाची वागणूक दिली म्हणताय मग गुलामांचे खिशातले राजीनामे पाच वर्षे बाहेर का आले नाहीत?; असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
अतुल भातखळकर हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी ते म्हणाले कि, ‘ शिवसेनेने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यानंतर भाजपशी विश्वासघात केला. दगा दिला. आता स्वत:च्या या कृतीचे समर्थन करण्यासाठी असले उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच भाजपने गुलामासारखी वागणूक दिली म्हणता, मग सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेची लोणी खाणे बरे वाटते का?, असा सवाल भातखळकर यांनी केला. बाळासाहेब ठाकरे गेले. तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या श्रद्धांजलीचं साधं ट्विटही केलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत राहणं म्हणजे गुलामगिरीपेक्षाही वाईट आहे. हे शिवसेनेने कायम लक्षात ठेवावे. असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जळगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना हा खुलासा केला. ते म्हणाले, ‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती.’असे ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाला राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्याची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले पत्र
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
- ‘चला, राऊतांनी हे मान्य तर केलं की त्यांचा वाघ पिंजऱ्यात आहे!’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- ‘केंद्रात काहीही होवो, युपीत भाजपचे सरकार जाणार हे निश्चित’, राष्ट्रवादीचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
