🕒 1 min read
पुणे : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. अशावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
यामुळेच आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत. भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत ६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनाचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील संभाजीराजेंच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी मात्र खासदार संभाजीराजेंच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संसदेत सरकारने ज्यावेळी १०२ वी घटना दुरुस्ती केली त्यावेळी तिथे हजर असताना संभाजीराजे याांनी तोंड का उघडले नाही? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. आणि ते मिळायलाच पाहिजे. पण मराठा आरक्षणावरून सध्या फक्त राजकारण केले जात आहे. तसेच खासदार संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्यावरून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण करण्याचा हेतू दिसून येत आहे असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मला पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक व्हायचं नाही, वसिम आक्रमचा मोठा खुलासा
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
- महाविकास आघाडी सरकार अडचणीत! मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
