Share

एवढी चिंता मी काँग्रेसमध्ये असताना का केली नाही?; ज्योतिरादित्य याचं राहुल गांधीना प्रत्युतर

Published On: 

नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी आपली स्वत:ची चिंता करावी माझी चिंता करू नये, असा टोलाही ज्योतिरादित्य सिंधीयानी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या बॅकबेंचर टीकेला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत बोलणे योग्य समजत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक स्तर असतो. गेल्या एक वर्षात मी खूप वर आलो आहे. राहुल गांधी आता माझी जेवढी चिंता करत आहेत. तेवढी चिंता त्यांनी मी काँग्रेसमध्ये असताना केली असती तर ते अधिक उचित ठरले असते, असा टोलाही सिंधीयानी यावेळी लगावला आहे.

राहुल गांधींनी ज्योतिरादित्य सिंधीयावर टीका करताना सिंधिया याच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह काम करून संघटनेला भक्कम करण्याचा पर्याय होता. एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनाल म्हणून मी त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी आपली वेगळी वाट निवडली. सिंधिया कॉंग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री बनू शकले असते, असा टोला राहुल गांधींनी काल लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!