हिंगोली : सोमवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात धार्मिक आणि तीर्थ क्षेत्रांना राज्य सरकारकडून निधी देण्याची घोषणा करण्यात आली. यात श्री.नामदेव तीर्थक्षेत्र यांचा समावेश करण्यात आला आहे. पण या तीर्थक्षेत्राला निधी किती मिळणार याची घोषणा मात्र केली गेली नाही. या तीर्थक्षेत्राला विशेष निधी दिला जाईल अशी पोकळ घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आल्याची टीका आ.तानाजी मुटकुळे यांनी केली.
श्री संत नामदेव यांनी संपूर्ण विश्वात भागवत खांद्यावर घेऊन पातकाचा प्रचार आणि प्रसार केला, त्यांची यावेळी ७५० वी जयंती आहे. या जयंती निमित्त राज्य सरकार भरीव निधी देईल अशी अपेक्षा केली जात होती. पण या सरकारने भाविकांचा विश्वास घात केला आहे. या सरकारने अर्थसंकल्पात श्री नामदेव तीर्थ क्षेत्राला विशेष निधी अशी पोकळ घोषणा महाविकास आघाडी सरकाने केली अशा आरोप आ. मुटकुळे यांनी केला.
दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने या तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटींचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी १५ कोटींचा निधी निधी मंजूर केला. त्यापैकी ३ कोटी इतका निधी जिल्हा नियोजन समितीकडे वितरित करण्यात आला होता. उर्वरित रक्कम महाविकास आघाडीने थांबवून ठेवल्याचा यावेळीत्यांनी आरोप केला.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
