Share

घाटीतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच : अमित देशमुख

Published On: 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) वर्ग -1 ते वर्ग-4 ची मंजूर पदे भरण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही पदे लवकरच भरली जातील असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या लेखी उत्तरात विधानपरिषदेमध्ये  सांगितले. औरंगाबाद व लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी (दि. 8) विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) वर्ग 1 ते वर्ग 4 ची मंजूर पदे 2300 आहेत. भरलेली पदे 1725 तर रिक्त पदे 575 आहेत. हे खरे आहे काय?, औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रूग्णालय येथील गट – अ ते गट – ड ची 219 पदे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे 223 पदास 8 जानेवारी 2021 रोजीच्या  आदेशानुसार मान्यता दिली हे खरे का?, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत शासकीय कर्करोग रूग्णालयात गट – अ ते गट – ड च्या 360 पदांना 6 जानेवारी 2021 च्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. हे खरे काय?, असल्यास सदर रूग्णालयातील मंजूर असलेली रिक्त पदे भरण्याबाबत तसेच स्वतंत्र लेखाशीर्ष करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी या वेळी विचारला होता.

आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लेखी उत्तर दिले आहे. यामध्ये औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील मंजूर पदांपैकी 868 पदे रिक्त असल्याचे म्हणाले.  हे रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तर औरंगाबाद येथील अतिविशेषोपचार रूग्णालय करिता स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करण्याची बाब विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!