Share

शरद पवारांना बजावलेली नोटीस ईडीने मागे का घेतली; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपने मात्र या मुद्द्यावरून संजय राऊत यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना काल हाणला होता. फडणवीसांच्या या टोलेबाजीचा नवाब मलिक यांनी आज समाचार घेतला. ‘तुमच्या कारवाईला घाबरतं कोण? महाराष्ट्रातील कोणीही नेता ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही. शरद पवारांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली होती. तिचं काय झालं? ती नोटीस मागे का घेतली गेली?, असा सवाल मलिक यांनी केला. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, ईडीच्या या नोटीशीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजपची जी आलिशान कार्यालये आहेत, त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावीत. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधक आहेत म्हणून जुने प्रकरण उगाळून काढून केवळ त्रास दिला जात आहे. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!