नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात जात आहेत. परिणामी राहुल गांधी आज काँग्रेसच्या स्थापना दिवसालाही उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले,केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते तारिक अन्वर या बैठकीला हजर असतील.
दरम्यान,राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावर अनेकांनी टीका केली. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत, असे टि्वट करुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले.
दरम्यान,काँग्रेस नेते खा. राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, “जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत”.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांनी काढला संजय राऊत यांना चिमटा
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

