मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला.’मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला.मी या प्रकरणी आज दुपारी दोन वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे असं सांगत हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचं देखील ते म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी देखील राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र शिवसेना मात्र राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे
आदित्य ठाकरे‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना म्हणाले, ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांनी काढला संजय राऊत यांना चिमटा
- युपीएच्या अध्यक्षपदाविषयी शरद पवारांनी केले मोठे विधान
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी राहणार काँग्रेसच्या स्थापना दिनाला गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

