नवी-दिल्ली : काल(७ फेब्रु.) लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच काँग्रेसला महागाईची चिंता “यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती?, असा सवालही मोदींनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,‘काँग्रेसने ५० वर्षे राज्य केले. परंतु त्यानंतर त्यांनी सत्ता का गमावली? नागालँडने १९९८ मध्ये, ओडिशाने २७ वर्षांपूर्वी काँग्रेसला अखेरचे निवडून दिले होते. गोव्यात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसने बहुमताने सत्ता मिळवली होती. त्रिपुरात १९८८ नंतर, तर पश्चिम बंगालमध्ये १९७२ नंतर काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. परंतु असे असले तरी काँग्रेसचा अहंकार कमी झालेला नाही’, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘काँग्रेसला महागाईची चिंता ‘’यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती? कोरोनाच्या काळात काँग्रेसचे सरकार असते तर महागाईचे खापर कोरोनावर मारून काँग्रेस नामानिराळा झाला असता. २०१४-२० या भाजपप्रणित सरकारच्या काळात चलनवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. २०२१ मध्ये हा दर ५.२ टक्के आणि खाद्यान्नाच्या चलनवाढीचा दर ३ टक्के होता. तसेच ७० च्या दशकापासून काँग्रेसने ‘’गरिबी हटाओ’’चा नारा दिला, गरिबी संपली नाही परंतु काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली’, असा टोलाही यावेळी मोदींनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’, संजय राऊतांनी व्यक्त केल्या भावना
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- “काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
- “इंग्रज परतले परंतु तोडा आणि राज्य करा ही वृत्ती काँग्रेसला देऊन गेले”
- बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

