मुंबई: मंगळवारी १० जुलैरोजी राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला निशाण्यावर धरले आहे. मराठा आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यावर भाजप खासदारांचे तोंड बंद का होते, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
या घटनादुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा या विधेयकामध्ये समावेश न केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तेव्हा राज्यातील भाजप खासदार मूग गिळून बसले होते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
५० टक्क्यांची मर्यादा जो पर्यंत उठवली जात नाही तोपर्यंच राज्यांना अधिकार देऊन काहीच फायद्याचे नाही. मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? त्यांनी यावेळी बोलायला हवे होते. असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

