Share

विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनी गुप्त बैठकांचा धडाका का सुरु केला आहे ?

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीत सध्या मोठी धुसफूस सुरु असून सत्तेत सहभागी असणारे तिन्ही पक्ष एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गुप्त बैठकींचा सिलसिला सुरु  झाला असून नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची जोरदार चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील उपलब्ध झाला नसला तरीही आगामी काळातील भाजपची रणनीती काय असावी या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील प्रमुख दोन पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या मंगळवारी ही गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्याच्या राजकारणात येणाऱ्या वादळापूर्वीची तर ही शांतता नाही ना असा देखील सवाल उपस्थित करायला वाव आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!