🕒 1 min read
पुणे : अनेक दिवस शांत असलेले सोलापूर हे शहर कालपासून राजकीय पटलावर चर्चेत आले आहे. सोलापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी भाषेत टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. काल रात्री आठच्या सुमारास पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
यानंतर, भाजप नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या कृत्याचा निषेध करतानाच पवारांवरील टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज कोरोना नियमांचे भंग केल्याने पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे या घडामोडी राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना सोलापुरात आज एक खळबळ उडवून देणारा प्रकार घडला आहे.
सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन व्यक्तींनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला झाला. तोडफोड करणारे दोघे पडळकर समर्थक असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. मात्र, याचे पडसाद उमटने सुरू झाले आहे.
या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला टोकाचा इशारा दिला आहे. ‘जिकडे कोणीच नाही. निर्मनुष्य ठिकाणी एक दोन कार्यकर्ते सोडून दगड मारुन मी वंचितांचा लीडर आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याना घाबरत नाही. मात्र त्यांच्या दोनचार लोकांनी जी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही हिंसेचं समर्थन केले नाही. हा पुन्हा पब्लिसिटी स्टंट आहे,’ अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
पुढे त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर खोचक टीका करतानाच भाजपला देखील इशारा दिला आहे. ‘हा व्यक्ती पिसाळलेला आहे. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे,’ असं मिटकरी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ बँकांमध्ये पैसे जमा करण्यास येऊ शकतात अडचणी; जाणून घ्या नवे नियम
- राजकीय गोटात खळबळ : आघाडीत बिघाडी ? शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये गुप्त बैठक
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला अशोक सराफांच्या कुटुंबीयांना ; किंमत तब्बल ५.२५ कोटी
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
