Share

‘चित्रपटगृह बंद का?’, वरूण धवनचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

Published On: 

मुंबई : गेल्या काही महिन्यापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. मात्र कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा ओसरु लागल्याने राज्य सरकारने हळुहळु लॉकडाऊनचे नियम शिथील केले आहे. यामध्ये मॉल, बार दारूची दुकाने खुले केले आहेत. मात्र चित्रपटगृह अद्याप ही बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने देखील याबाबत नाराजी व्यक्त करत सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

bollywood actor varun dhawan questions goverment express his sadness by sharing post about mumbai market ठाकरे सरकारवर संतापला अभिनेता वरुण धवन ; पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी | aad 97 ...

वरूणने शेअर केलेल्या व्हिडीओत मुंबईतील वांद्रे भागत गर्दी असलेली दिसत आहे. याद्वारे त्याने चित्रपटगृह बंद ठेवल्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वरूणने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘सगळं काही सुरू, मात्र चित्रपटगृह बंद का?’, असा सवाल उपस्थितीत करत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या निर्बंधात शिथीलता आणण्याचा निर्णय घेतला. या नियमानुसार रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल, मॉल्स सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे अद्यापही बंदच ठेवण्याच्या निर्णयात राज्य सरकारने काहीच बदल केला नाही. इतर काही राज्यात चित्रपटगृहे सुरु करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रमध्ये अजून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंदच आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!