पुणे: वाहतूक कोंडीचा सामना करणे हे पुणे-मुंबई मधील नागरिकांसाठी नवीन गोष्ट नाही. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन वाहतूक विभागाकडून तयार करण्यात येतात. त्यानुसार नो पोर्किंगमध्ये कोणी गाडी लावल्यास वाहतूक पोलीस टोईंग करतात आणि दंड वसूल करतात. मात्र यावेळी पुण्यामध्ये नो पोर्किंगमध्ये वाहन लावल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर एक अनोखा प्रकार समोर आला आहे.
वाहतूक विभागाकडून कारवाई करत असताना पुण्यातील नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवले. ही घटना गुरूवारी पावणे-पाचच्या सुमारास घडली आहे. ही संपूर्ण घटना व्हिडीओमधून समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. यावरून अनेकजण संताप व्यक्त करताना दिसत आहे.

या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे की, एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवत आहे. मात्र यावेळी या दुचाकीस्वाराला काही दुखापत होण्याची शक्यता होती. तसेच दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याच्या मेंदूला मार लागु शकला असता याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा प्रश्न देखील उपस्थिती होत आहे. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पद्धतीने कारवाई करण योग्य वाटते का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांचा फौजफाटा असूनही पहाटे पाचलाच पडळकरांची बैलगाडा शर्यत पार’
- फडणवीसांनी तालिबानी विचारांशी केली स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची तुलना! म्हणाले…
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”


