Share

महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. या प्रकणावर कंगणाने अर्णव गोस्वामी यांचे समर्थन करत एक व्हिडीओ आपल्या ट्विटर वर पोस्ट केला आहे.

आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पात्रातून केला होता. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णब गोस्वामी याला अलिबाग न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावर कंगणा रनौतने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधत ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये ती रिपब्लिक भारतचे  संपादक अर्णव गोस्वामी यांची बाजू घेत म्हणाली कि , “मी महाराष्ट्र सरकारला एक प्रश्न विचारते कि तुम्ही अर्णव गो स्वामीच्या घरात जाऊन त्यांना मारहाण केली आहे, असे तुम्ही किती घर तोडले आहेत. असे तुम्ही किती लोकांचे आवाज दाबणार अहात, किती लोकांची तोंड बंद करणार? जेवढे आवाज तुम्ही दाबाल तेवढे आवाज उठतील, आमच्या आधी किती लोकांचे गेळे कापले गेले आहेत. जेवढे आवाज तुम्ही फ्री ऑफ स्पीच साठी दाबाल तेवढे आवाज उठतील.”

यासोबतच तिने महाराष्ट्र सरकारला सोनिया सेना, पप्पु सेना, पेंग्विन म्हणत जहरी टीका केली आहे. ती म्हणाली, “जर पेंग्वीन सारखे दिसत आहात तर पेंग्वीनच बोलणार तुम्हाला का राग येत आहे. पप्पू सेना सारखे काम केले तर पप्पू सेनाच म्हणणार ना सोनिया सेना म्हणाल्यावर राग येत आहे का? तर आहेत तुम्ही सोनिया सेना. ”

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!