मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.
जर, रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.
यावरच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्ट मध्ये त्या म्हणाल्या, ‘आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा, महिलेवर दबाव आणून हाणून पाडला राष्ट्रवादी पुन्हा गंभीर आरोपाच्या तक्रारीत, विवाहबाह्य संबंधात धनंजय मुंडे बिनविरोध विजयी. मंत्र्यांच्या विरोधात यापुढे आता महिला तक्रार करायला घाबरतील, कारण धमक्या आणि दबाव आणून रेणू शर्माला, तिच्या वकिलांना तक्रार मागे घ्यायलाच लावली. हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण? असे म्हणत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादीला सवाल केला आहे.
https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/3685808704842358
महत्वाच्या बातम्या
- “पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, वर्णद्वेषावर सिराजचा खुलासा
- कसोटी संघाचे नेतृत्व रहाणे करणार ?
- ‘उद्या, मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं कोणी करणार का ?’
- रेणू शर्मांकडून तक्रार मागे; शरद पवार म्हणाले…
- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांकडून तक्रार मागे


