Share

‘जो काँग्रेससोबत बेईमानी करेल त्याला गाडीतून ओढा आणि दोन लाथा घाला’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: काँग्रेस नेते सुनील केदार यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘किती मोठा नेता असू द्या, जो जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत काँग्रेससोबत बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून काढा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसेस मी बघून घेईन. वेळ आली तर मी मंत्रिपद बाजूला ठेवेल.आणि मी पण पुढे येईन, असे वक्तव्य दुग्ध व पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. ते नागपूरच्या काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नागपूरमध्ये आता लवकरच जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यानिमित्ताने एका बैठकीत सुनील केदार यांनी हे विधान केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेससोबत बेईमानी करणाऱ्याला धडा शिकवा असेही म्हटले आहे.

काँग्रेस हा पक्ष सर्वांनी मिळून मोठा केला आहे. त्यामुळे कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे, त्यामुळे वाटेल तसे करणार हे चालणार नाही. असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र त्यांच्या या विधानाने दुसराच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!