Share

हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी

Published On: 

नागपूर: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत (The first car on hydrogen fuel) १६ मार्चपासून चालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच काही दिवसानंतर ती नागपुरात आणली जाणार आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेच्यावतीने शहरात राबवला जाणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण करण्यात येईल. ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे विदर्भ हे केंद्र असणार आहे. असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

तसेच विदर्भात ७५ टक्के पाणी आणि ८५ टक्के जंगल असल्यामुळे याची मागणी मोठी आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मँगनीज आहे. त्या ठिकाणी स्टील उद्योगांची मोठी क्षमता असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात उद्योगाची मोठी क्षमता आहे. मात्र आपल्याकडे एकमेकांत ताळमेळ नसल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच आता सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!