🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने त्यांना ‘आधीश’ या बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणे अडचणीत (Narayan Rane in trouble) येण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांचा जुहू येथे ‘आधीश’ नावाचा बंगला आहे. या बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्यामुळे त्यांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. याच्या उत्तरासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी नारायण राणेंच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी बीएमसीची टीम आली होती. या टीममध्ये बीएमसी च्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने राणेंच्या बंगल्याची पाहणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीएमसीचीच्या नोटीसीला राणे काय उत्तर देतात ते लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
-
जनरल व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावर राऊतांचे टीकास्त्र; म्हणाले, “सध्या मंगळावरचे राहू द्या…”
-
“…तर राष्ट्र्वादीचे नेते राज्यात कसे फिरतात हे पाहू”, ‘त्या’ घटनेवरून नितेश राणेंचा इशारा
-
आता घरीच करा स्वस्त आणि मस्त कॅरेटिन ट्रीटमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
