पुणे : मागच्या वर्षभरापासून शेतकरी वादळी पावसाचा व हवामान बदलाचा सामना करत आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे आर्थिक नुकसान झेलावे लागले. आता शेतकऱ्यांना आणखी एका संकटांना सामना करावा लागणार आहे, तो म्हणजे खत पुरवठा सामना.
सध्या युद्धामुळे रशियामधून होणाऱ्या खत पुरवठ्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. दरात दुपटीने वाढ झाली. भारतीय शेतकऱ्यांसाठी भारत सरकारला नव्या पर्यांयांचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. खरिपात खते मोठ्या प्रमाणात गरजेची असतात. पुढे आणखी मोठ्या समस्या उद्भवण्यापेक्षा आताच खरीपातील खताची आयात केली तर शेतकऱ्यांना आर्थिक तोटा व खत पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत.
या उपायाने नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. तसे पाहिले तर देशाच्या एकूण खत आयाती पैकी रशिया, बेलारुस आणि युक्रेन या 3 देशातून 20 टक्क्यांपर्यंत खत आयात होत असतो. यामध्ये 70 लाख टन डीएपी, 50 लाख टन पोटॅशची आयात एवढी खतांची आयात केली जाते. तसेच खत पुरवठा नियमित झाला तरी खतांच्या किमतीमध्ये दुप्पटीने वाढ होणार असल्याचे खते विक्रेते उत्तम अग्रो यांनी सांगितले आहे. सध्या नेहमीच्या तुलनेत 20 ते 30 टक्के खताचा साठा भारताकडे आहे. त्यामुळे 2 महिन्यात खतांचे नियोजन करावे लागणार आहे अन्यथा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे असे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

