🕒 1 min read
मुंबई:- केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, एखाद्या व्यक्तीला ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्सचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे.
लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी कामं राज्य सरकारनं करायची आहेत ती आम्ही करत आहोत. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाचा अवमान करणाऱ्या संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा; भाजपची मागणी
- आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र रस्ते अडवणे गैर : कोर्ट
- सोन्यासह रोखरक्कम लंपास करत मुथूट फिनकॉर्पला दिवसाढवळ्या लुटलं…
- #Happy Birthday : यूथ आयकॉन जॉन अब्राहमचा आज ४८वा जन्मदिवस
- हा न्यायालयाचा अपमान!, भाजप आमदाराने केली राऊतांविरोधात कारवाईची मागणी


