🕒 1 min read
मुंबई- मेट्रो कारशेड उभारण्यासाठी मुंबईतली कांजूरमार्ग इथली 102 एकर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं काल अंतरिम स्थगिती दिली. या स्थगिती आदेशानं राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे.
संजय राऊत यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर टिप्पणी केली होती. हायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. ही जमीन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.
दरम्यान, संजय राऊत यांची वक्तव्ये बेताल आणि बेजबाबदार आहेत. आज तर थेट न्यायालयाने काय केलं पाहिजे हेच ते सांगत आहेत. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
संजय राऊतांनी कोर्टावर असं भाष्य करणे हा कोर्टाचा अवमान आहे. राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच असे आरोप करणे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

