🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक हिरो आहेत. पण काही स्वत: ला सिद्ध करून एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि विशेषत्वाने लक्षात राहतात. असंच एक नाव आहे ते नाव म्हणजे जॉन अब्राहम. जॉनने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याने दिग्दर्शक महेश भट यांच्या ‘जिस्म’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बॉलीवूडमधला सर्वांत फिट आणि स्मार्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या जॉन अब्राहम आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘जिस्म’ चित्रपटानंतर जॉन एका ज्योतिषाला भेटला होता. त्या ज्योतिषाने जॉनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भविष्यच नसल्याचं सांगितलं. पण जॉननी ते भविष्य खोटं करून दाखवलं. तो आता केवळ अभिनेता नाही, तर यशस्वी निर्माताही झाला आहे. जॉन अब्राहमच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
जिस्म, पाप, लकीर, साया हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 2004 मध्ये आलेल्या ‘धूम’ चित्रपटाने जॉनला खरी ओळख आणि यशही मिळवून दिलं. या चित्रपटातल्या त्याच्या खलनायकी भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं. लांब केस, सिक्स पॅक अब्ज आणि सुपर बाईकसोबत जॉन, भारतीय तरुणांसाठी यूथ आयकॉनच झाला होता. आगामी वर्षात जॉनचे ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘मुंबई सागा’ हे चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या दोन्ही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

