Share

हा न्यायालयाचा अपमान!, भाजप आमदाराने केली राऊतांविरोधात कारवाईची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जमिनीच्या वापरावरुन उच्च न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारचा दणका दिलाय. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल करतानाच त्यांनी महाराष्ट्रातील सरकार भाजपचं नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का, अशी शंका देखील उपस्थित केली होती.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हणत संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!… न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी…’ यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!