मुंबई: दिनांक ६ फेब्रुवारी रविवार पासून वेस्टइंडीजचा भारत दौरा सुरु होणार आहे. हा मर्यादित षटकांचा दौरा असणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने अहमदाबाद येथे तर ३ टी-२० सामने कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार आहेत. परंतु, वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यावर कोरोना विषाणूचे सावट मात्र मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. भारतीय संघातील एकूण ७ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात ४ खेळाडू आहेत तर ३ सपोर्ट स्टाफ मधील व्यक्ती आहेत. भारताच्या एकदिवसीय संघात शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीवीर म्हणून निवड झाली होती मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते आगामी मालिका खेळू शकणार नाहीयेत.
त्यामुळे रोहितबरोबर सलामीला कोण येणार याची उत्सुकता तमाम क्रिकेट रसिकांना लागली आहे. रोहित शर्मा बरोबर आता सलामीला ४ जणांची नाव समोर येत आहेत. वेंकटेश अय्यर हा सर्वात मोठा सामील पर्याय म्हणून पुढे येत आहे. मयांक अगरवाल हा रोहित शर्मा बरोबर सलामीला उतरायला म्हणून दुसरा पर्याय समोर येत आहे. तर सूर्यकुमार यादव हा तिसरा पर्याय म्हणून पुढे येत आहे.
तर चार पर्यायांपैकी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव देखील आता पुढे येत आहे. वेंकटेश अय्यर, मयांक अगरवाल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांपैकी कोणीही रोहित शर्मा बरोबर सलामीला आले तरी भारताची सलामीची जोडी अत्यंत कणखर होईल यात काही शंका नाही.
महत्वाच्या बातम्या :
- हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व निंदनिय; औरंगाबाद जिल्हा प्रशासनावर इम्तियाज जलील यांची नाराजी!
- राज्यातील निर्बंध वाढणार की कमी होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
- २१ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाज आयसीसीकडून बॅन
- असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबाराची चौकाशी करा – नवाब मलिक
- ‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पाहिजे, अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्ट व्हायरल


