🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तानचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अडचणीत आला आहे. लाहोरमधील बायोमेकॅनिकल चाचणीनंतर त्याच्या बॉलिंग ऍक्शन आणि त्याच्यावर बॉलिंग करण्यावर बंदी घालण्यात आली. या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हसनैनसाठी गोलंदाजी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
बिग बॅश लीग दरम्यान त्याने सिडनी थंडरकडून खेळताना पहिल्याच सामन्यात हॅट्रिक केली होती. अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ४ ओव्हरमध्ये २० धावा देत ३ विकेट्स घेतले होते. तो सध्याच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडूनही खेळत होता पण आता तो खेळू शकणार नाही. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीची ऍक्शन नियमांचे उलंघन करत असल्याचे बीबीएल पदार्पणानंतर पंच जेरार्ड अबाऊड यांनी नोंदवले होते. त्याच सामन्यात हसनैनने हॅट्रिक केली होती आणि स्क्वेअर लेग अंपायर अबूद यांनी सुद्धा त्याच्या बॉलिंग ऍक्शन आक्षेप घेतला होता.
Pakistan fast bowler Mohammad Hasnain's bowling action has been found to be illegal
He underwent tests on his action last month at Lahore after being first reported while playing in #BBL11
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 4, 2022
लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. हसनैनचा बॉलिंग ऍक्शन आयसीसीच्या नियमांनुसार १५ डिग्री मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. गुड लेन्थ, फुल लेन्थ, स्लो बाउन्सर आणि बाउन्सर बॉलसाठी ही ऍक्शन वादग्रस्त ठरली आहे. हसनैन खेळताना १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता. त्याला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतूनही बाहेर पडावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा आयपीएल बाबतीत बडा खुलासा
- ‘बंडातात्या कराडकर जे म्हटले ते…’; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
- संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- ‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
