Share

राज्यातील निर्बंध वाढणार की कमी होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाचे चिन्ह दिसत असतानाच आता निर्बंध वाढणार की कमी होणार असे प्रश्न निर्माण होत आहेत. यावरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“आता कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही रुग्णसंख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे”, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

तसेच कोरोनाची रुग्णसंख्या ४८ हजारांवरून १०-१५ हजारावर आली आहे. जिथे उच्चांक होता तिथेही रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आपण मार्चमध्ये एन्डेमिकपर्यंत जाऊ, असं मला वाटतं. काही ठिकाणी वाढ होतेय, तिथे उच्चांक गाठला जाईल. पण त्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा कमी होईल असा अंदाज येत आहे. त्यामुळे शासनाचा कल निर्बंध वाढवण्याकडे नसून कमी करण्याकडे असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!