🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे. आता माने आज दुपारी साडे तीन वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या अगोदर त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजच्या पत्रकार परिषदेत काय सांगणार आहे, तसेच वकिलांसह कोणत्या तीन कायदेशीर बाबींवर बोलणार असल्याची एक नवी फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
दरम्यान अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकल्यानंतर प्रोडक्शन हाऊस, मालिकेतील कलाकार, टीकाकार, नेतेमंडळी यांच्यात जवळपास एक आठवडा होत आला. मालिकेतील काही कलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तन केल्याचं बोललं गेल. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा मानस किरण माने यांनी बोलून दाखवला होता. काल या दुसऱ्या लढ्याची घोषणा केल्यानंतर आज पुन्हा फेसबुक पोस्ट करत त्यांनी वकील असिम सरोदे (Asim Sarode) यांच्यासह सविस्तर भूमिका मांडणार आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट
“आज दुपारी साडे तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लबला. मी आणि माझे वकील असिम सरोदे… समस्त मराठी कलाकारांनो, मी तुमच्यासाठी लढतोय. एक कलाकार म्हणून तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहिले असाल किंवा नसाल. तुम्ही पुरोगामी असाल-प्रतिगामी असाल किंवा ‘सोयिस्कर’ तटस्थ असाल. तुम्ही माझा द्वेष करत असाल किंवा तुम्हाला माझ्याबद्दल ‘सहवेदना’ असेल.तुम्हाला माझी बाजू पटत असेल किंवा तुम्ही माझ्या विरोधकांच्या बाजूनं असाल किंवा कन्फ्यूज्ड असाल. काहीही असेल, तरीही हा किरण माने पॅटर्न तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे”, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कुठलंच प्रॉडक्शन हाऊस हिम्मत करणार नाही!
पुढे किरण माने म्हणतात, “तुम्ही स्ट्रगलर असाल किंवा नाववाले असाल, तरी मी तुमच्या हक्कासाठी लढतोय हे लक्षात ठेवा. किरण माने पॅटर्न कलाकारांच्या न होणाऱ्या एकजुटीला पर्याय आहे. माझ्या लढाईत मी जिंकल्यानंतर, तुम्हाला एका फोनवर उद्यापासून तू या सिरीयलमध्ये-नाटकात नसशील. असं सांगायची कुठलंच प्रॉडक्शन हाऊस हिम्मत करणार नाही. तुम्ही स्त्री असाल तर कुठलाही पुरूष तुमच्याशी सेटवर गैरवर्तन करायला धजावणार नाही. तुम्ही पुरूष असाल तर तुमचा कुठलाही हितशत्रू, कुठल्याही स्त्रीच्या आडून तुमच्यावर खोट्या-बेसलेस ‘गैरवर्तना’च्या आरोपाचं कटकारस्थान करण्याची हिम्मत करणार नाही. कुठलीही भगिनी कुणावरही खोटे आरोप करताना हजार वेळा विचार करेल”,
तसेच “काही हिंदी प्रॉडक्शन हाऊसेसनी मराठीत येऊन खूप घाण केलेली आहे. त्यांचे ‘हेड ऑफ प्रॉडक्शन’ आणि ‘प्रॉडक्शन कंट्रोलर’ अशा पोस्टवरची अनेक ऐशआरामी-छंदीफंदी-व्यसनी ‘रंगीले रतन’ मराठीतलं ‘चालचलन’ बिघडवतायत… त्या माजोरड्यांना हा मेसेज गेला पायजे की एखादा ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल, मन लावून काम करु. यासह बऱ्याच गोष्टींवर या पास्टमध्ये किरण माने यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“मुंबईतीत ३ टक्के घटस्पोट वाहतूक कोंडीमुळे होतात”, अमृता फडणवीसांचा दावा
-
तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीसांची बायको – अमृता फडणवीस
-
कंगना रणौतने सलमान खानवर साधला निशाणा म्हणाली, “हे तुमच्या भाईचे घर..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
