मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नोएडात एक हजार हेक्टरवर फिल्म सिटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. आग्रा, मधूरा, दिल्लीवरून ही फिल्म सिटी जवळ असल्याचेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, आता फिल्म सिटीवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र किंवा मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य आहे. अनेक कलाकार हे मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत सवलती सोयी, फिल्मसिटी, लोकेशन यासारख्या विविध ठिकाणं आहेत. काही वेळा परदेशात जाऊनही शूटींग केली जाते. त्यामुळे कोणी मुद्दाम बॉलिवूड कुठे घेऊन जावू नये, असे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.तसेच सर्व सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याची गोष्ट करत आहेत ही चांगलीच बाब आहे. परंतु हे समजून घ्या की, १०० वर्षांपासून मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही. लोकं पूर्णपणे अन्य राज्यांमध्ये निघून जातील, पण बॉलिवूडचा दर्जा कोणी संपवू शकणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

