Share

लखनऊ संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? अँडी फ्लॉवरसह दिग्गजांची नावे आली समोर

Published On: 

नवी दिल्ली : जिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर (Andy Flower) इंडियन प्रीमियर लीग 2022 (2022 Indian Premier League) मध्ये लखनऊ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अँडी फ्लॉवरने पंजाब किंग्जच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या व्यतिरिक्तही अनेक नावे संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत पुढे येत आहेत.

टीमच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले, अनेक नावे ऐकत आहोत. आजचही कोणीतरी लिहिले की गॅरी कर्स्टन प्रशिक्षक होणार आहेत. आम्ही काही लोकांशी याविषयी चर्चा करत आहोत पण जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत आम्ही खात्री देऊ शकत नाही.

फ्लॉवर 2020 च्या आयपीएलपूर्वी पंजाब संघाशी संबंधित होता आणि गेल्या दोन हंगामात मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत काम केले. फ्लॉवर आणि कर्स्टन यांच्याशिवाय न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल विटोरी आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचीही लखनऊ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नावं ऐकायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!