Share

बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये जनकल्याणासाठी सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी पक्षाने केला या पक्षाकडे असलेल्या ११ खात्यांना २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात २ लाख ५० हजार ३८८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला आहे. मात्र यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar ) यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला असून शिवसेनेला तुलनेत एक चतुर्थांश निधी मिळाला आहे. बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय? अशी खोचक टीका करत अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. सरकारी निधीच्या टक्केवारीचे गणित जुळल्याशिवाय शिवसेना सरकारी निधी खर्च करत नाही. असा आरोपही अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्रिपद आणि सर्वाधिक आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेने या रकमेच्या एकचतुर्थांश म्हणजेच केवळ ५४ हजार ३४३ कोटींची रक्कम खात्यांवर खर्च केली आहे. अर्थखाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६६ हजार २८९ कोटींची कामे शिवसेनेच्या अखत्यारीतील खात्यांसाठी मंजूर केली होती. तर सर्वांत कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसनेही १ लाख २१ हजार १४ कोटींचे अनुदान मंजूर करून घेतले असून त्यातील १ लाख १ हजार ७६८ कोटींचा निधी खर्च केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!