मुंबई : देशातील भाजपा सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासर्गीयांचे (ओबीसी OBC) राजकीय आरक्षण संपवण्याचा डाव आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, आरक्षण नको ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. केंद्रातील भाजप सरकार तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहे. भाजपला व संघाला देशातून आरक्षण संपवायचे आहे. मात्र फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा स्वीकारलेले पक्ष व सरकार त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर पंचायत) निवडणुका लागल्या आहेत. येत्या २१ डिसेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यात न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण स्थगित केल्याने निवडणूक आयोगाने ओबीसी जागांची निवडणूक रद्द केली आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डाटाची अट राज्य सरकारने पूर्ण केली गेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Courte) राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका करत आहेत. राज्य सरकारला ९ महिन्यांचा वेळ मिळूनही इम्पिरिकल डाटा तयार केला नाही, असा आरोप राज्य सरकारवर केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री; केजरीवालांची टीका
- ‘आम्ही भरवलेल्या शर्यतीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डोळे उघडले’
- बोगराची लढाई ही १९७१ च्या युद्धाचा सर्वाधिक रक्तरंजित अध्याय- चंद्रकांत पाटील

