Share

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये जनकल्याणासाठी सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी पक्षाने केला या पक्षाकडे असलेल्या ११ खात्यांना २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात २ लाख ५० हजार ३८८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मुख्यमंत्रिपद आणि सर्वाधिक आमदारसंख्या असलेल्या शिवसेनेने या रकमेच्या एकचतुर्थांश म्हणजेच केवळ ५४ हजार ३४३ कोटींची रक्कम खात्यांवर खर्च केली आहे. अर्थखाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६६ हजार २८९ कोटींची कामे शिवसेनेच्या अखत्यारीतील खात्यांसाठी मंजूर केली होती. तर सर्वांत कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसनेही १ लाख २१ हजार १४ कोटींचे अनुदान मंजूर करून घेतले असून त्यातील १ लाख १ हजार ७६८ कोटींचा निधी खर्च केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने खर्चात घेतलेली आघाडी सातत्याने कायम ठेवली आहे. कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आरोग्य खात्याला अधिक रक्कम मिळाली आहे. त्यामुळे सर्वाधिक निधी राष्ट्रवादी पक्षाला मिळाला आहे. मात्र यावरूनही भाजपकडून निधीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!