Share

शरद पवारांचे फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय ‘मंकीपॉक्स’ झाला; अमोल मिटकरींची टीका

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांचा विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंनी कुणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र आज (मंगळवार) एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा फोटो शेअर करून मनसेने खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. मनसेचे नेते गजानन काळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

शरद पवारांनी राज ठाकरेंविरोधात रसद पुरवल्याचा आरोप होत आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. “पवार साहेबांचे जुने फोटो ट्विट करणाऱ्यांना राजकीय ‘मंकीपॉक्स’ नावाचा आजार झालेला आहे. या आजारापासून महाराष्ट्राने सावध रहावे. काही ‘मंकी’ मर्कटचाळे सोडणार नाहीत. ‘पांडे बुवा’ सारखे पळपुटे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेत,” असा टोला मिटकरींनी लगावला आहे.

रोहित पवारांनी देखील साधला मनसेवर निशाणा 

शरद पवारांवर रसद पुरवल्याचा आरोप झाल्यानंतर रोहित पवारांनी मनसेवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार ब्रिजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.”

महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राज ठाकरेंनी केला होता आरोप

राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. पण अयोध्या दौऱ्याच्या १५ दिवस आधी २० मे रोजी राज ठाकरे यांनी ट्विट करून आपला अयोध्या दौरा तूर्तास पुढे ढकलला होता. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 22 मे रोजी पुण्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी दावा केला की, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर विरोध सुरू केला. यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मात्र रसद कुणी पुरवली हे राज ठाकरेंनी सांगितले नव्हते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!