सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सरकार यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं दिसून येत आहे. सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यापासून ते राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीपर्यंत हा संघर्ष सुरु असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे.
आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘राजभवन हे भाजपभवन झाले आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत अशा वेळी पक्षपात करणे चुकीचे आहे,’ अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
‘कुणाला घाबरण्याचे कारण नाही’
‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. १७१ आमदारांचा महाविकास विकास आघाडीला पाठिंबा आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही.’ असं भाजपला खडसावतानाच त्यांनी, ‘विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्ष निवड होईल. कुणाला घाबरण्याचे कारण नाही,’ अशी माहिती देखील दिली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोदींनी सही का नाही केली ?
‘सरकार आल्यानंतर मोदी म्हणाले होते की, मी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेन. मग आतापर्यंत सही का नाही केली ?’ असा सवाल करत नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपने सुशांतच्या नावावर संपूर्ण निवडणूक लढवली; आता सचिन वाझे प्रकरणी…’
- ‘अशा’ अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिमा धुळीला मिळवली
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

