Share

नांदेडमध्ये पहिल्या दिवशी लॉकडाऊनचे व्यापाऱ्यांकडून काटेकोर पालन 

Published On: 

 नांदेड : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शनिवारी अंशत: लॉकडाऊन जाहीर केल्या. त्यामुळे शनिवारी नागरिकांकडून याचे काटेकोरपणे पालन केलेले आढळून आले. सायंकाळी सातच्या सुमारास शहरासह परिसरातील दुकाने स्वत: हून बंद केले. या साठी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाऊल उचलले आहे.

नागरिकांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट झाला होता. तसेच रत्यावरील वर्दळ देखील खुप कमी झालेली दिसून आली. शहरातसह जिल्हाभरात दररोज २०० च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अंशत: लॉकडाऊनचा पर्यायाचा विचार करुन शनिवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा असणार आहे. आणि पार्सल सेवा मात्र सुरु असणार आहे. तर  शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक ५९१ च्या वर कोरोना रुग्ण वाढल्याचा आकडा आहे.

जिल्हातील दारुचे दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी आहे. तर परमीट रुम रात्री आठ वाजेपर्यंत उघडे असणार आहे. दरम्यान पहिल्या दिवशी नवीन मोंढा, भाग्यनगर, श्रीनगर, वजीराबाद, जुना मोंढा या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकाने सात वाजेच्या काट्यानुसार शटर बंद झालेले दिसून आले.

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची फौज तैनात 

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरातील पोलिसांनी गस्त घालणे देखील सुरु केले. तर पोलिस रस्त्यावरील नागरिकांना लाउडस्पीकरवरुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन देखील करत होते. तर या वेळी सोबतीला नांदेड – वाघाळा महानगर पालिकेचे पथकही बाजारपेठेत दुकानांची तपासणी देखील करत असताना दिसत आहेत. यासाठी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.

रात्री दहा नंतर पोलिस करताहेत वाहनांची तपासणी 

शहरातील पोलिस शनिवारी रात्री पोलिसांनी ठरावीक पॉइंट देखील लावले आहेत. या वेळी पोलिस रात्री दहा नंतर अचानक वाहनांची तपासणी करणे सुरु केली होती. दरम्यान पोलिस विना कारणे फिरणारे तसेच विना मास्क फिरणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारत होते. या दरम्यान जर रुग्ण जास्त निघण्याचे प्रमाणात थांबले नाही तर पुन्हा लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून संकेत मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!