औरंगाबाद : औरंगाबाद शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या समाधी स्मारकाचे संवर्धन व संरक्षण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या समाधी स्मारकाच्या ठिकाणी पडझड झाली असून शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, श्री क्षेत्र वेरुळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज अनुक्रमे व्यंकोजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, विठोजी राजे भोसले, शहाजीराजे भोसले यांचे समाधी स्मारक आहे. आजच्या स्थितीत हे समाधी स्मारक जीर्ण अवस्थेत आहे. याठिकाणी देखभाल, दुरुस्तीअभावी पडझड झाली आहे.
या समाधी स्मारकांचे संवर्धन व संरक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे परिसराला वेगळे वैभव प्राप्त होऊ शकते. वेरूळ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर मंदिर, तसेच जगप्रसिद्ध वेरूळ लेणी सुद्धा आहे. याच ठिकाणी असलेल्या समाधी स्मारकांचेही ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तातडीने या स्मारकांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकरिता संबंधित खात्यास निर्देशित करावे, अशी मागणी आ. दानवे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी आता अजित पवारांनी दिला शब्द, म्हणाले…
- ‘सुरक्षित वातावरणात १० जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे’
- ऐश्वर्याला प्रपोज करणाऱ्या चाहत्याला अभिषेक बच्चनने दिले हटके उत्तर…
- संभाजीराजेंचा असा अवतार मी पाहिला नाही, मोदींनी भेट न दिल्यामुळेच त्यांचा संताप – मुश्रीफ
- धक्कादायक ! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
