Share

‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या भारताच्या कामगिरीसाठी डब्लूएचओने थोपटली पाठ !

Published On: 

नवी दिल्ली: कोरोना काळामध्ये जगाप्रमाणे भारत देखील मोठ्या संकातून जात होता. यामध्ये आरोग्य यंत्रणा, सरकार वरील दबाव, आर्थिक नुकसान हे आणि असे अनेक आव्हानं भारतासमोर उभी होती. मात्र यातून देखील देशाने वेळोवेळी निर्णय घेत लॉकडाऊन केल. अत्यावश्यक सेवांनाच प्राधान्य दिले. अत्यावश्यक कर्मचार्यांनी आपली कर्तव्य चोख बजावले. आणि हळूहळू देशातील परिस्थिती सुधारत असताना अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली.

दरम्यान, अमेरिका इंग्लंड नंतर भारताने देखील लसीकरणाला सुरुवात केली. आणि कोरोनाच्या विरुद्ध लढाईतील एक मोठा टप्पापार पडला. आता भारत इतर देशांना देखील लस पुरवत आहे.

या पार्श्वभूमीवर या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. ‘कोरोनावर भारताने नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवल्याचे’ संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या विषाणूवर आपण या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास सहज मात करु शकतो, भारताच्या कामगिरीवरुन हे आपल्याला दिसते. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो, असेही आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात घटत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या आकडेवारीत घट होत आहे, जी सप्टेंबर २०२०च्या मध्यावर सर्वात उच्च पातळीवर पोहोचली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!