दीपक पाठक/पुणे : कोरोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीयसह खासगी कार्यालये सुरू झाली़ त्यामुळे साहजिकच सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली आहे़ रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या मात्र अजूनही बऱ्याच गाड्या सुरु केल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
सोलापूरच्या प्रवाश्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मद्रास मेल,चेन्नई एक्सप्रेस,हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस तसेच इंद्रायणी एक्सप्रेस सुरू करणाबाबत अद्याप रेल्वे विभागाकडून कोणताच ठोस निर्णय घेतला जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून या दोन्ही गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.करमाळा तालुक्याला लागून असणाऱ्या तीन तालुकांच्या प्रवाश्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे जेऊर हे एक स्टेशन आहे. या ठिकाणी उद्यान आणि हुतात्मा एक्सप्रेसला जेऊर या स्टेशनला थांबा द्यावा अशी देखील मागणी रेल्वे प्रवासी मंचाचे अध्यक्ष अभयराज लुंकड यांनी केली आहे.
यातच हैद्राबाद एक्स्प्रेस जी सुरु करण्यात आली आहे त्या गाडीने प्रवास करायचा असल्यास आरक्षण आवश्यक आहे त्यामुळे या सेवेचा सुद्धा लाभ काहीच प्रवाश्यांना घेता येत आहे. बऱ्याच प्रवाश्यांना आरक्षण मिळत नाही मिळाले तर कन्फर्म होत नाही अश्या तक्रारी प्रवाश्यांच्या आहेत.बऱ्याचदा संपूर्ण कुटुंबाला प्रवास करायचा असतो मात्र सर्वांचे तिकीट कन्फर्म होत नसल्याने इतर सदस्यांना देखील तिकीट रद्द करावे लागत आहे.
याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अशिकारी मनोज झंवर यांच्या संपर्क साधला असता परिस्थिती जशीजशी सामान्य होईल तसतश्या नव्या गाड्या सुरु केल्या जातील असे त्यांनी सांगितले.सुटीच्या हंगामात अजून गाड्या वाढवल्या जाण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली तसेच याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.दरम्यान,दररोज लाखो प्रवासी या रेल्वेच्या सेवेचा वापर करत असतात मात्र सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरु असलेल्या या भोंगळ कारभारामुळे अनेकांचा खोळंबा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?
- पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार – राकेश टिकैत
- खा. इम्तियाज जलील, खा. फौजिया खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर निवड
- बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करा ; भाजपची मागणी
- पॉवरग्रीडचे कार्यालय फोडणाऱ्यांना 9 तासांत अटक; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
