मुंबई:- गुरुवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. यानंतर काल दुपारी नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं होतं.
दरम्यान आता संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतना नाना पटोले यांच्यावर सामनातून टीका केलेली नसल्याचं म्हटलंय. नानांच्या क्षमेतेचे कौतुक केल्याचं ते म्हणाले. संजय राऊत नाना पटोले सर्वांना प्रिय आहेत, असंही म्हणाले आहेत.
नाना पटोलेंवर टीका केलेली नाही उलट त्यांचं कौतुक केलं आहे. नाना पटोलेंचा काँग्रेसला संजिवनी देण्याचा उत्साह महत्वाचा आहे. काँग्रेस देशात सत्तेत नसला तरी महत्वाचा पक्ष आहे. काँग्रेसला परंपरा आणि इतिहास आहे. नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असले तरी त्यांच्या पक्षाला देशात संजिवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे, असं संजय राऊत यांनी सांगतिलं. पक्षांतर्गत काय परिवर्तन करायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बंदी उठल्यानंतर श्रीसंतची आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी
- ‘काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही’
- आखिल भारतीय छावा संघटनेच्या उपोषण: भाजपचा पाठिंबा
- राज्यात पुन्हा सुरु झालेली ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा केवळ बुडबुडा ठरणार ?
- फासा पलटवण्यासाठी माझ्या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा- संजय राऊत


