Share

निदेशकांना नियुक्तीची प्रतीक्षा: कोरोना काळात विनामानधन काम केले

Published On: 

🕒 1 min read

जालना : शाळेतील सहावी ते आठवी च्या वर्गातील विद्यार्थी संख्या शंभर असेल अशा शाळेत कला, क्रिडा, कार्यानुभव निदेशकांची नियुक्त्या देण्यात यावी. असा आरटीईचा कायदा आहे. या अनुषंगाने अशा शाळेत कला, क्रिडा, कार्यानुभव निदेशकांची नियुक्त्या २०१६ ला तीन वर्षासाठी दिल्या होत्या. ही सेवा संपल्यानंतर नियमांप्रमाणे पटसंख्या असलेल्या शाळेत सन २०१९-२० या वर्षी आज ना उद्या नियुक्त्या मिळेल. या आशेने गतवर्षी पंटसंख्या असुन ही विनामानधन काम केले. तरीही अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही.

या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासुन कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने या निदेशकाला काम करत असतांना अल्पशा मानधनही मिळाले नाही. गतवर्षी निदेशकांनी शाळेत विनामानधन काम पहिले. तसेच शाळेत पटसंख्या असुन ही कोरोनाच्या काळात ही मानधन नसल्यामुळे या निदेशकांचा संसार उघडयावर आला. पटसंख्या असुनही नियुक्त्या दिल्या जात नसल्याने या निदेशकांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.

भोकरदन कला निदेशक प्रताप ठोंबरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, निदेशकाला जे मानधन मिळते ते रोजदांरीवर काम करणाऱ्यांपेक्षा कमी आहे. पण तेही वेळेवर मिळत नाही त्यात निदेशक सलग सहा वर्षे कायम नियुक्त्याच्या आशेवर काम करत आहे. सद्यस्थितीत आता शाळा सुरु झाल्या असल्या तरी निदेशकाला नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे निदेशकांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!